राज ठाकरे यांनी मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्या संदर्भात 3 मे पर्यंतचा सरकारला अल्टीमेटम दिला आहे. याच संदर्भात औरंगाबाद येथे राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. मात्र या सभेला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, वंचित बहुजन आघाडी, पॅन्थर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल या पक्ष संघटनांनी विरोध केला आहे. पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन सभेला परवानगी नाकारावी असे या पक्ष संघटनांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाल्यास दंगली होण्याची दाट शक्यता असल्याचे या पक्षांनी म्हटलं आहे. दरम्यान परिस्थिती पाहून पोलीस आयुक्त निर्णय घेतील असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. एका बाजूला सभेला विरोध होत असताना दुसरीकडे मनसे च्या वतीने सभेची जोरदार तयारी सुरु आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon