एटीएम फोडण्यासाठी जिलेटिनचा वापर, स्फोटत एटीएम पूर्णपणे चकणाचूर
पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवून ए टी एम फोडल्याची घटना गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे समोर आले आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी पैसे काढण्यासाठी हे एटीएम फोडले असल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले आहे. जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट एवढा भयानक होता की त्यामुळे संपूर्ण एटीएम मशीन उद्धवस्त झाली आहे.पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरात कॅनरा बँकेचे एटीएम आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अज्ञात व्यक्ती मोटर सायकल वर येऊन जिलेटिनच्या कांड्यांचा वापर करून स्फोट घडवून ए टी एम फोडून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु स्फोट एवढा मोठा होता की एटीएम पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. घटनेच्या चौकशी साठी बीडीडीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon