सकाळी 11 वाजता बी रघुनाथ सभागृह येथे महात्मा फुले जयंती निमित्त अभिवादन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी जिल्हापरिषेदेचे मुख्याधिकारी शिवानंद टाकसाळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ फौजीया खान,आमदार डॉ राहुल पाटील,कवी साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव,महापौर अनिताताई सोनकांबळे,शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, उपमहापौर भगवान वाघमारे,गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, किरण मानवतकर, उपकुलसचिव व.ना.म कृषी विद्यापीठ सुरेश हिवराळे,नानासाहेब राऊत,इंजि. केशव कार्लेकर,माजी सभापती रवींद्र सोनकांबळे,डॉ विवेक नावंदर, गौतम मुंढे,रवी पतंगे,एन आय काळे,डॉ सुनील जाधव,डॉ राहुल रणवीर,डॉ मुरलीधर सांगळे,सिद्धार्थ भराडे,नगरसेवक सुशील कांबळे व प्रांजल बोधक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महोत्सव समितीचे अध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांनी केले तर,समन्वयक गौतम मुंढे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.या प्रसंगी संसद रत्न खा. फौजीया खान व कवी साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव यांचा माणपत्र व सन्मानचिन्ह देऊन समितीच्यावातीने गौरव करण्यात आला.मानपात्राचे वाचन कवी अरुण चव्हाण व प्रा.सुनील तुरुकमाने यांनी केलं. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात महापुरुषांचे विचार तळागाळातील वंचित समूहापर्यंत पोहचविण्याचे काम करण्याचे आवाहन केले.
खासदार डॉ फौजीया खान, आमदार डॉ राहुल पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे व प्रा. इंद्रजित भालेराव यांचे भावपूर्ण भाषणे झाली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या व्यक्तींचा, महिला बचतगट तसेच प्रबोधनाचे कार्यकरणाऱ्या भीम शाहिरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी स्टार प्रवाह फेम छोटे उस्ताद गायिका प्रांजल बोधक हिचा विशेष सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महोत्सवसमितीचे मुख्य समन्वयक राहुल वहिवाळ यांनी केले तर आभार उमेश शेळके यांनी मानले.महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रा.सुनील तुरुकमाने राहुल वहिवाळ सुधीर साळवे आशिष वाकोडे ,उमेश शेळके ,निलेश डुमने ,नवाब पटेल,संदीप गायकवाड ,प्रमोद पुंडगे ,संदीप खाडे ,चंद्रकांत लहाने ,चंद्रकांत धुतमल व शाहीर दासा पुंडगे आदींनी परिश्रम घेतले.
ConversionConversion EmoticonEmoticon