मुंबई : पेट्रोल-डिझेल, गॅस व खाद्य तेल दरवाढीच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे निदर्शन आंदोलन


मुंबई चेंबूर येथे महागाईच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी द्वारा निदर्शने आंदोलन (BRSP: Protest against petrol-deisel, LPG gas price hike)
मुंबई : पेट्रोल-डिझेल, गॅस व खाद्य तेल दरवाढीविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशासलिस्ट पार्टी, मुंबई प्रदेश द्वारा 8 एप्रिल रोजी निदर्शन आंदोलन करण्यात आले.
सध्या राज्यात व देशात पेट्रोल डिझेल, एलपीजी सीएनजीपी गॅस व खाद्य तेलाच्या किंमती भरमसाठ वाढत आहेत. वाढती बेरोजगारी त्यात दैनंदिन व अत्यावश्यक वापराच्या वस्तूंच्या किंमती भरमसाठ रोजच वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकाने महागाई दर कमी करून राज्यातील व देशातीन सर्वसामान्य नागरिकांवरील अधिकचा आर्थिक भार कमी करून दिलासा द्यावा. यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी ) चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ सुरेश माने यांच्या आदेशानुसार महागाईच्या विरोधात मुंबई -चेंबूर मधील छगन मीठा पेट्रोल पंप जवळ चूल मांडून जोरदार घोषणा बाजी करत निदर्शने आंदोलन करण्यात आले.

मुंबई दक्षिण जिल्हाध्यक्ष दीपक चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी ऍड. दिनेश राजभर (प्रदेश सचिव ), जितेंद्र निकाळजे (मुंबई अध्यक्ष ), वत्सला हिरे (मुंबई महिला जिल्हाध्यक्ष ), राजाराम आढाव ( चेंबूर विधानसभा प्रभारी ),सतेश मस्के (चेंबूर अध्यक्ष ), फारुक सय्यद (अध्यक्ष माहीम विधानसभा ),हसन शेख,(जिल्हाध्यक्ष रोजगार आघाडी ),अन्वर शेख (जिल्हा उपाध्यक्ष ),महेमूद शेख (अध्यक्ष धारावी विधानसभा ),प्रसंजित आठवले (चेंबूर विधानसभा महासचिव ),तोफीक शेख (महासचिव माहीम विधानसभा ) यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng