औरंगाबाद : पेट्रोल-डिझेल, गॅस व खाद्य तेल दरवाढीच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी ) च्यावतीने आज दि. 8 एप्रिल रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात भव्य आणि तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. भरमसाठ पेट्रोल डिझेल गॅस, खाद्य तेल अशा अत्यावश्यक व जीवनावशक वस्तूंच्या भरमसाठ दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आधीच वाढती बेरोजगारी आणि त्यात आकाशाला भिडणारे पेट्रोल-डिझेल, गॅस व खाद्य तेलाचे दिवसेंदिवस वाढणारे दर यामुळे राज्यातील सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार वा केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकार यां महागाईला जबाबदार आहेत.महागाई दर कमी करून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांवरील अधिकचा आर्थिक भार कमी करावा. यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी )चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.डॉ सुरेश माने यांच्या आदेशानुसार औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील क्रांती चौकात जोरदार घोषणा बाजी करून भव्य आणि तीव्र असे निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे (बीआरएसपी )जिल्हा, विधानसभा, शहर व विविध आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon