शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर जमावाचा हल्ला ; वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात


शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर हल्ला झाला असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर अचानक हल्ला झाला.शरद पवार यांच्या विरोधात निषेधात घोषणा बाजी करत जमावाने चप्पल व दगड फेक करत हिंसक हल्ला केला. एसटी संपकरी कर्मचाऱ्यांच्या जमावाने हल्ला केला असून आता पर्यन्त 107 जनांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या जमावाने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने कोर्टात लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी गावदेवी पोलीस ठाण्यात नेले आहे. त्याठिकाणी माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

शरद पवार यांच्या घरावर जमावाने अचानक हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेऊन गावदेवी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. पोलीसांच्या ताब्यात असतानाच सदावर्ते यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली.

मला कोणतीही सूचना देण्यात आली नाही. मला काहीही सांगितले नाही आणि मला थेट जबरदस्तीने पोलीस ठाण्यात आणले आहे.हे बेकायदेशीर असून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. माझी हत्या झाल्यास त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असे गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.पोलिसांनी यांची हल्ल्यासंबंधी चौकशी करण्यात येत आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी देखील माध्यमांशी बोलताना पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. माझे पती व संपूर्ण कुटुंबाला धोका आहे. जर आम्हाला काही झाले तर शरद पवार यांना जबाबदार धरले जाईल असं जयश्री पाटील यांनी सांगितले. सदावर्ते यांना पोलिसांनी गावदेवी पोलीस ठाण्यात आणल्या नंतर जयश्री पाटील मुलीसह तिथे आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng