मुंबई : शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवास्थानी जमावाकडून शुक्रवारी हल्ला झाला होता. त्या पार्शवभूमीवर आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री पोलिसांनी तिथून हुसकाऊन लावले असल्यामुळे आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी आता सीएसटीएम रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. त्यातील अनेक कर्मचारी रेल्वेने आपापल्या घरी जात असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी शुक्रवारी एस टी कर्मचाऱ्यांच्या जमावाने चप्पला फेकून आणि निषेदाच्या घोषणा करून हल्ला केला. यानंतर जमावातील 107 लोकांवर गुन्हा नोंद झाला असून 103 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यात 23 महिलांचा देखील समावेश आहे. याघटने नंतर मुंबई पोलीस हरकतीत आली असून आझाद मैदानावर बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री तिथून हुसकावून लावले आहे.
एस टी कर्मचारांचा सीएसटीएम रेल्वे स्थानकात
ठिय्या
पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावरून उठवल्या नंतर कर्मचाऱ्यांनी सीएसटीएम रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. काही कर्मचारी रेल्वे पकडून आपापल्या गावी जाण्यामार्गावर आहेत. परंतु आता रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात बसलेल्या कर्मचाऱ्यांना तिकीटची विचारना केली जात आहे. ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनाच आता स्थानक बसू दिले जात असून ज्यांच्याकडे तिकीट नाही त्यांना स्थानाकबाहेर काढून दिले जात आहे.
रेल्वे स्थानाकातून देखील आंदोलकांना बाहेर काढल्या जात आहे
रेल्वे स्थानक हे आंदोलनाचे ठिकाण नाही असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र काही कर्मचारी इथेच बसून राहणार अशी भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र ज्यांच्याकडे फ्लॅटफार्म किंवा प्रवासाचे तिकीट आहे अशांनाच तिथे बसू दिले जात आहे.त्यामुळे लांब पल्ल्याचे काही कर्मचाऱ्यांनी आरक्षित तिकीट देखील काढलेले आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon