चंद्रपूर : बीआरएसपीचे पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढ विरोधात धरणे प्रदर्शन


बीआरएसपी द्वारा पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी विरोधात निदर्शने 
चंद्रपूर : बीआरएसपी चंद्रपूर विधानसभा युनिटच्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस (petrol-diesel and gas price hike)दरवाढी विरोधात निदर्शने  करण्यात आले.दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढत असल्यामुळे राज्यातील व देशातील सर्वसामान्य नागरिकांना दर रोज वाढणाऱ्या पेट्रोल डिझेल व गॅसच्या दर वाढीमुळे तसेच खाद्य तेल, डाळी व इतर महागाई मुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन बिघडत असून त्यांना अनंत अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

पेट्रोल डिझेल आणि गॅस दर वाढ कमी करून राज्यातील जनतेवरील अतिरिक्त आर्थिक भार कमी करावा यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकारच्या विरोधात 5 एप्रिल मंगलवार रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी )चंद्रपूर विधानसभेच्यावतीने प्रियदर्शनी चौक चंद्रपूर येथे भव्य निदर्शने करण्यात आले. तात्काळ महागाई कमी न केल्यास रस्ता रोखो आंदोलन करण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला.
चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष महेंद्र झाडे यांच्या नेतृत्वाखाली हे भव्य निदर्शने करण्यात आले.यावेळी बी आरएसपीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जे डी रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष-विजय गोंढाणे, जिल्हा महासचिव-राजु रामटेके, युवा जिल्हा महासचिव धम्मदीप बांबोळे,संजय वानखेडे, अरविंद मानकर,अमोल जुनघरे, ऍड. विशाल रंगारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते 


Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng