कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या :
कंत्राटी कामगारांना 350 रुपये रोजंदारी मिळावी, कंत्राटी कामगारांना पीएफ नंबर देण्यात यावा. दिवसाची 8 तास कामाची वेळ निश्चित करावी तसेच ज्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे त्यांना परत कामावर रुजू करून घ्यावे अशा विविध मागण्या संबंधी भद्रावती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे भद्रावती विधानसभा अध्यक्ष अजय लिहीतकर,शहर अध्यक्ष विकास दुर्योधन, तालुका-अध्यक्ष प्रकाश रामटेके, स्वप्नील कोल्हटकर,दिपक वानखेडे, विशाल कांबळे,अंकुश पोगे आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon