तक्रार दार महिला व आमदार गणेश नाईक हे लिव्ह इन रेलेशन मध्ये रहात होते. त्यादरम्यान या दोघांना एक मुलगाही झाला होता. या मुलाला वडिल म्हणून आमदार 'गणेश नाईक' यांचं नाव देण्याची मागणी तक्रार दार महिलेने केली होती.
मात्र भाजपा आमदार गणेश नाईक यांनी बंदूकीचा धाक दाखवून जीवेमारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांचबरोबर राज्य महिला आयोगाकडे देखील या महिलेने तक्रार केली आहे.
या प्रकरणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आमदार गणेश नाईक यांनी डी एन ए चाचणी करून आरोपाचं उत्तर द्यावं असं म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon