शुक्रवारी रात्री 9:45 वाजता हा अपघात झाला आहे. गदग एक्सप्रेस आणि पुदूचेरी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या सी एस टी एम वरून एकाच वेळेला सुटल्यामुळे एकामागोमाग एक धावत असताना दादर रेल्वे स्थानाकावरून निघाल्यास पुदूचेरी एक्सप्रेस माटुंगा रेल्वे स्थानकावर येऊन थांबली असताना मागून येणाऱ्या गदग एक्सप्रेसने पुदूचेरी एक्सप्रेसला मागून धडक दिली.
या अपघातात पुदूचेरी एक्सप्रेसचे तीन डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गदग एक्सप्रेसच्या इंजिनने पुदूचेरी एक्सप्रेसच्या मागील डब्ब्यास धडक दिल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर पुदूचेरी एक्सप्रेस मधील प्रवाशांनी खाली उड्या घेतल्याने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.माटुंगा रेल्वे स्थानाकावरील क्रॉसिंग रुळावर हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातामुळे जलद गाड्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता.त्यामुळे रोजची ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली. अपघाताचे नेमकं कारण मात्र समजू शकले नव्हते. अपघात का व कसा झाला याची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon