Accident : ट्रकची दुचाकीला जोरदार धडक ; अपघातात दुचाकी स्वार ठार, ट्रक चालक फरार


अकोल्यातील अशोक वाटीका चौकात भरधाव ट्रक ने दुचाकीला दिली धडक, दुचाकीवरील वृद्ध जागीच ठार 
अकोला : भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचावरील वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाली आहे. हा अपघात सकाळी 8 च्या सुमारास अशोक वाटिका चौक येथे झाला आहे.घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.अपघाताच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची गर्दी मोठ्याप्रमाणात जमली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत वृद्ध व्यक्तीस शववाहिकेद्वारे शव विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र अपघात मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नव्हती. दरम्यान अपघाता नंतर फरार झालेल्या ट्रक चालकाचा सिटी कोतवाली पोलीस शोध घेत आहेत.

Previous
Next Post »