बुद्धांचे विचार जीवनात अंगीकारण्याची गरज - गगन मलिक


भारत भ्रमण धम्म यात्रेचे परभणी शहरात भव्य स्वागत 
परभणी : तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा अंगीकार करून जीवन सार्थक करावे असे आवाहन सिनेभिनेता गगन मलिक (श्रामनेर अशोक ) यांनी केलं आहे.भारत भ्रमण धम्म यात्रेचे परभणी शहरात 4 एप्रिल रोजी आगमन झाले होते. विसावा कॉर्नर, नवजीवन कॉलनीच्या वतीने महाराणा प्रताप चौक येथे , डॉ आंबेडकर नगर, भीमनगर, बाबासाहेब आंबेडकर  पुतळा परिसर व बी रघुनाथ सभागृहा पर्यन्त ठीक ठिकाणी धम्म यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.
 शुभ्र वस्त्र परिधान करून बौद्ध उपासक उपासिका यांच्या सह भिखू संघ यात्रेत सहभागी झाले.ही यात्रा बी रघुनाथ सभागृह येथे पोहचली.भारत भ्रमण धम्म यात्रेनिमित्त धम्म देशना व स्वागत समारोहाचे आयोजन बी रघुनाथ सभागृह येथे सिद्धार्थ हत्तीआंबीरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग यांनी केले होते.गगन मलिक (श्रामनेर अशोक ) व थायलंड येथून आलेल्या भिखू संघाचे स्वागत आयोजक सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांनी केले.
गगन मलिक (श्रामनेर अशोक ) यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी गगन मलिक म्हणले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे बुध्दमय भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार प्रत्येक घरात पोहचविण्याची गरज आहे आहे.त्यासाठीच ही भारत भ्रमण धम्म यात्रा काढण्यात आली असल्याचे गगन मलिक म्हणले.यावेळी गगन मलिक यांच्या सह थायलंड येथील भिखू संघ, आयोजक सिद्धार्थ हत्तीआंबीरे, भदंत उपगुप्त महास्थावीर,आमदार डॉ राहुल पाटील यांची मांचावर उपस्थित होती . भदंत उपगुप्त मागास्थ्वीर यांनी त्रिशरण पंचशील दिले.
धम्म यात्रा स्वागत सोहळ्याचे आयोजक सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांनी आपल्या प्रस्ताविकात म्हटले की गगन मलिक यांच्यामुळेच थायलंड येथील भिखू संघाचा परभणीकरांना सहवास लाभला आहे.जिल्ह्यात दहा हजार बुद्ध मूर्तीचे वाटप करण्याचा संकल्प आहे.हा संकल्प पूर्ण करण्यासाठी गगन मलिक यांनी त्या द्याव्यात असे सिद्धार्थ हत्तीआंबीरे म्हणाले.




ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng