हवाला व्यवहारासंबंधी 2 डायऱ्या जप्त करण्यात आल्या असून त्यात कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराची नोंद आहे
औरंगाबाद : शहरातील चेलीपुरा भागात असलेल्या रमेश राईस किराणा दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत 'हवाला' च्या माध्यमातून आलेले तब्बल 1 कोटी 90 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या किराणा दुकानातून मागील अनेक दिवसापासून 'हवाला' चा व्यवहार होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.छाप्या दरम्यान 'हवाला'ची डायरी जप्त करण्यात आली असून त्यात कोट्यावधी रुपयांच्या नोंदी असल्याचे आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.
चेलीपुरा भागातील किराणा व्यापारी आशिष रमेशचंद्र सावजी यांचे रमेश राईस किराणा दुकान आहे.या किराणा दुकानावर मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाने छापा टाकून 1 कोटी 90 लाख 50 हजार रुपये जप्त केले आहेत. छाप्या दरम्यान 2 डायऱ्या देखील जप्त केल्या असून त्यामध्ये कोट्यावधी रुपयांची नोंद असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
आशिष सावजी हे 'पीएम' नावाने असलेल्या यजन्सीसाठी काम करत होते. मोबाईल फोन द्वारे येणाऱ्या कोड च्या माध्यमातून संबंधित व्यक्तींचे टोपण नाव लिहून पैसे दिले जायचे आणि तसेच घेतले पण जायचे.मात्र या व्यवहाराची अधिकृतपणे कुठेही नोंद नसायची. डायरीत लिहिलेला व्यवहार हाच 6tyg70 असायचा.छाप्या नंतर आशिष सावजी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.सर्व रक्कम, डायरी आणि मोबाईल जप्त करून त्यांचा जवाब घेतल्या नंतर नोटीस देऊन सोडून दिले आहे.
आशिष सावजी याचा पोलीस अधिकृत जवाब नोंदवून घेतल्या नंतर सविस्तर अहवाल आयकर विभागाला सोपविण्यात येईल.त्यानंतर जप्त केलेली रक्कम नागपूर आयकर कार्यालयच्या परवानगीने बँकेत जमा करण्यात येईल आणि त्यानंतर सावजी याच्याकडील उत्पन्नाची चौकशी करण्यात येईल.अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे.
हवालाचा व्यवहार सांभाळणाऱ्याला आर्धा टक्का कमिशन
हवालाचा व्यवहार सांभाळणाऱ्याला आर्धा टक्का कमिशन दिले जाते.अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका आयकर अधिकाऱ्यांनी सांगितली आहे.
हवाला व्यवहारातील जप्त केलेली रक्कम सांभाळण्यासाठी आयुक्तालयात दोन बंदूक धारी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेला दोन दिवस लागत असल्याने ही सुरक्षा व्यवस्था करण्यातआली आहे
ConversionConversion EmoticonEmoticon