भोंगे आणि हनुमान चालीसा देशाच्या विकासाचा मुद्दा आहे का?

राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न भेडसावत असताना भोंगे आणि हनुमान चालीसा हा देशाचा मुद्दा बनवताना राजकीय नेते दिसत आहेत 
महाराष्ट्रात सध्या भोंगे आणि हनुमान चालीसा कळीचा विषय झालेला आहे. उन्हाचा पारा जसा दिवसेंदिवस वाढत आहे तसेच भोंगे आणि हनुमान चालीसावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जितीवरील भोंगे काढण्यावरून वादाला तोंड फोडले आहे. तेव्हापासून राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसा हा एकच विषय राज्यातील विरोधी पक्ष चघळताना दिसत आहेत.या माध्यमातून राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे विसकळीत करण्याचा प्रयत्न राजकीय नेते करत आहेत. रोजच आरोप -प्रत्यारोप, हल्ला-प्रतिहाल्ला या घटनामुळे महाराष्ट्र सध्या चर्चेत आहे.

भोंगे आणि हनुमान चालीसा खरच देशाच्या विकासाचा मुद्दा आहे का?
भोंगे आणि हनुमान चालीसा खरचं राज्य आणि देशातील जनतेच्या विकासाचा मुद्दा आहे का? भरमसाठ महागाई, दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीमुळे सर्वसामाय जनता मेटाकुतीला आली असताना या मुद्यावर मात्र राजकीय पक्ष अजिबात बोलत नाहीत. दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवून आणायच्या आणि जनतेच्या मुळ समस्यांना बगल देत जनतेचं लक्ष नको त्या मुद्याकडे वळवायचे आणि आपली राजकीय पोलीस भाजून घ्यायची हाच एकमेव उद्देश विरोधक आणि सत्ताधारी पक्षांचा आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या मीडियातील काही मीडिया तर सत्ताधाऱ्यांचे सालगडी म्हणूनच काम करताना दिसतात. आपल्या चॅनेलची टीआरपी वाढवण्याच्या नादात जनतेच्या प्रश्नावर सरकारला कधी प्रश्न विचारून धारेवर धरत नाहीत. जनतेच्या हिसाठी सरकारला जाब विचारणे आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला भाग पाडणे ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी आहे. मात्र तसे न करता केवळ सत्ताधाऱ्यांची टीमकी वाजवून आपला टीआरपी वाढवणे एवढं काम करताना लोकशाहीचा चौथा स्तंभ दिसत आहे.

                                            संपादकीय....
                                  
Previous
Next Post »