मुंबई : दंगली पेटवणारे हे उच्चवर्णीय, ब्राहम आहेत बहुजन मुलांना दंगलीत उतरवू नका असं सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar )यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मस्जितीवरील भोंगे उतरविण्यास सांगितले होते. मस्जितिवरील भोंगे काढले नाही तर दुप्पट आवाजात मस्जितीसमोर हनुमान चालीसा वाचन करू असं राज ठाकरे यांनी वादग्रस्त विधान केलं होत.त्यांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडविल्या जात असल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे राज्यात सर्वत्र चर्चा रंगू लागली असताना सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.बाबरी मस्जित दंगल असो की भीमा कोरेगाव दंगल असो यात बहुजनांची मुलं सहभागी आहेत. राज ठाकरे यांनी आधी स्वतःच्या मुलाला म्हणजेच अमित ठाकरेला खुशाल आंदोलनात व दंगलीत पुढे करावे. मात्र बहुजनांच्या मुलांना पुढे करून दंगली भडकावू नयेत असे सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon