पशुसंवर्धन पायाभूत विकास निधी अंतर्गत विविध प्रकल्प उभारणीसाठी 5 लाख ते एक कोटी पर्यंत अर्थसाहाय्य मिळणार
परभणी : केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत विकास निधी अंतर्गत राज्यात सन 2020-21 ते सन 2021- 22 या कालावधीसाठी 15 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या योजनेची तळागळातील सर्व घटका पर्यंत माहिती पोहचऊन योजनेचा लाभ मिळावा व तसेच योजने अंतर्गत प्रकल्प किंमत 5 लाख ते एक कोटी पर्यंत असून 50 ते 75 टक्के सबसिडी मिळणार असल्याची माहिती डॉ पी.पी नेमाडे पशुसंवर्धन उपायुक्त परभणी यांनी दिली आहे.सदर योजने अंतर्गत खालील 4 वर्गवारीतील विविध प्रक्रिया /उत्पादन / संवर्धन घटकांचा समावेश केला आहे.
अ - दूध व दुग्धजन्यप्रक्रिया :
1) आईस्क्रीम युनिट 2) चीज उत्पादन युनिट 3)उच्च तापमान दूध निरजंतूकीकरण युनिट 4)सुगंधी दूध उत्पादन युनिट 5)दूध पावडर उत्पादन युनिट 6) व्हे पावडर उत्पादन युनिट 7)इतर दुग्धोजन्य पदार्थ निर्मिती युनिट
ब ) मास प्रक्रिया
1) ग्रामीण तसेच निमशहरी व शहरी भागात शेळी- मेंढी/कुक्कुट / वराह / म्हैस वर्गीय पशुधनाच्या मास प्रक्रिये साठी नवीन युनिटची स्थापना.
2)मास साठविण्यासाठी शीत गृहाची उभारणी,
मासातील सूक्ष्म जीव जंतू तपासणी प्रयोग शाळा, मास प्रक्रियेतील उप-उत्पादनाच्या योग्य विल्हेवाटी करिता युनिट उभारणे इत्यादी.
क )पशुखाद्य निर्मिती:
1)लघु, मध्य व उच्चपशुपक्षी खाद्य निर्मिती केंद्र 2)टोटल मिक्स रॅशन (टीएमआर )ब्लॉक मेकिंग युनिट
3) बायपास प्रोटीन युनिट 4)खनिज मिश्रण उत्पादन केंद्र 5)मुरघास निर्मिती केंद्र 6)खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा.
ड )पशुसंवर्धन :
1)लिंग विनिच्छित वीर्यमात्रा निर्मिती केंद्र
2)बाह्य भलन केंद्र (आयव्हीएफ ), 3)पशुधनाच्या शूद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन.या सर्व प्रकल्पासाठी 90 टक्के कर्ज दिले जाणार असून 3 टक्के व्याज दारात सवलत दिली जाणार आहे. वरील प्रकल्प उभारणीसाठी
1)शेतकरी उत्पादक संस्था 2)खाजगी संस्था 3)व्यक्तिगत उद्योग4) खाजगी व्यक्ती 5)लघु व मध्यम उद्योग 6)कलम (सेकशन) 8 अनुसार स्थान झालेल्या संस्था अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची पद्धत : https://www.nlm.udyamimitra.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
ConversionConversion EmoticonEmoticon