औरंगाबाद : राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची बीआरएसपीची मागणी ; पोलीस उपायुक्त अर्पणा गीते यांच्याकडे दिली तक्रार


राज ठाकरे यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बीआरएसपी व लोकशाही विचार मंच द्वारा पोलीस उपायुक्त अर्पणा गीते यांच्याकडे करण्यात आली.
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर आयोजित मेळाव्यात भाषण करताना मस्जितीवरील भोंगे उतरविण्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शनिवार दि.9 मार्च रोजी बीआरएसपीच्या वतीने पोलीस उपयुक्ताकडे तक्रार देण्यात आली.

मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणे आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारे बेताल वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होत. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक जाती धर्मांना आपापल्या धर्मा प्रमाणे धार्मिक पूजा अर्चा व प्रार्थना करण्याचा अधिकार दिला असताना राज ठाकरे यांनी अशा प्रकारचे  बेताल व धार्मिक तेढ निर्माण करणारे तसेच हिंदू-मुस्लिम समाजात दंगली घडवून आणण्याचा आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारचे समाज विघातक व देश विघातक कृत्य करण्याच्या उद्देशाने पूर्वनियोजित पद्धतीने केलेलं वक्तव्य असल्यामुळे याला तात्काळ आळा बसला पाहिजे, या करिता राज ठाकरे यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी औरंगाबाद जिल्हा युनिट व लोकशाही विचारमंच च्यावतीने औरंगाबाद जिल्हा पोलीस उपायुक्त अर्पणा गीते यांना निवेदणाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे,सय्यद निसार (शहर अध्यक्ष ),शेख अजीम वणीकर (जिल्हाउपाध्यक्ष ),मेराज खान (जिल्हाउपाध्यक्ष लोकशाही विचार मंच ),सय्यद नुसरत ( जिल्हा कोषाध्यक्ष ),राजु निकाळजे (युवा जिल्हाध्यक्ष ),नितेश तांगडे (जिल्हा महासचिव ),शेख खालेद (शहर सचिव ),अनामी मोरे (युवा शहर अध्यक्ष ),शेख मोसीन (शहराध्यक्ष अल्पसंख्यांक ),विकास वाव्हळ (शहराध्यक्ष कामगार ),जितेंद्र बोर्डे (पश्चिम अध्यक्ष ) व शेख मुस्ताक (पूर्व उपाध्यक्ष )आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Previous
Next Post »