महाराष्ट्रातील सीईटी परीक्षा पुढे ढकलली ; जून ऐवजी ऑगस्ट मध्ये होणार सीईटी परीक्षा

                      (संग्रहित चित्र )

राज्यातील सी ई टी परीक्षा पुढे ढकलली, जून ऐवजी ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा 
मुंबई :
राज्यात होणारी सीईटी परीक्षा आता जून ऐवजी ऑगस्ट महिन्यात होणार. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील जेईई (JEE) मेन आणि नीट (NEET) परीक्षांच्या अनुशंगाने महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

दर वर्षी राज्यातील सी ई टी परीक्षा पूर्व नियोजित वेळा पत्रकानुसार जून महिन्यात 11 ते 28 तारखेपर्यंत होणार होत्या मात्र, आता त्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितले आहे.परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.असे सामंत यांनी सांगितले आहे.

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जे ई ई आणि वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट (NEET) परीक्षा या जून आणि जुलै महिन्यात घेतल्या जाणार असून जेईईचे (JEE) पाहिले 29 जून तर दुसरे सत्र 30 जुलै 2022 रोजी संपणार आहे.तर याच दरम्यान 27 जुलै 2022 रोजी नीट (NEET) परीक्षा होणार आहे. हा परीक्षांचा गोंधळ टाळण्यासाठी राज्यातील सी ई टी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सीईटी परीक्षेची नोंदणी सुरु आहे. विद्यार्थ्यांनी mhtcet2022.mahacet.org किंवा cetcell. mahacet.org या संकेत स्थळावर नोंदणी करावी.
Previous
Next Post »