नवाब मलिकाविरोधात 5 हजार पानांचे आरोप पत्र दाखल

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात मनीलॉंड्रीन्ग प्रकरणी 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल 
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात मनीलॉंड्रीन्ग प्रकरणी पाच हजार पानांचे आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे.नवाब मलिक हे मागील 23 फेब्रुवारी पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. दाऊद इब्राहिम संबंधित मनीलॉंड्रीन्ग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ) गुरुवारी नवाब मलिक यांच्या विरोधात 5 हजार पानांचे आरोप पत्र दाखल केले आहे.

या प्रकरणी ईडी च्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या रजिस्ट्री मध्ये 5000 पानांचे आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. मनिलॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या प्रकरणासाठी विशेष न्यायालय कागद पत्राची पडताळणी करून नंतरच दाखल घेईल असे वकिलांनी म्हटले आहे. मात्र नवाब मलिक यांचे कुटुंब तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीने विशेष न्यायालयात सांगिले आहे.

 नवाब मलिक यांचे मुलं अमीर मलिक आणि फराज मलिक यांना अनेक वेळा ईडीने समन्स पाठवून देखील चौकशी साठी हजर रहात नाहीत.नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने 5 हजार पाणी आरोपपत्र दाखल केलं असून त्यात 9 खंड आणि 52 परिशिष्ट आरोप पत्रात समाविष्ट आहेत. या प्रकरणात नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
Previous
Next Post »