पुणे : पुण्यात कुरिअरने तलवारी मागविण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. औरंगाबादमध्ये कुरिअर ने तलवारी मागविण्यात आल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात देखील कुरिअरने तलवारी मागविण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड प्लेस येथील कुरिअर कार्यालयात कुरिअरने तलवारी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी 1 एप्रिल रोजी कुरिअर कार्यालयात एक पार्सल आल होतं. पार्सल हे संशयास्पद असल्याचे लक्षात येताच कुरिअर कार्यालयातून स्वारगेट पोलीस स्टेशनला फोन आला की आमच्या कार्यालयात एक पार्सल आले आहे जे संशयास्पद आहे. त्यानुसार आमच्या कर्मचाऱ्यांनी पार्सल पाकीट उघडून पाहिले असता त्यात 2 तलवारी असल्याचे आढळून आले असल्याचे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगिले आहे
तलवारी लुधियांनावरून आल्यचा पत्ता आहे. तलवारी कोणी मागविल्या याबाबत तपास चालू असल्याचे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी माहिती दिली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon