नाशिक मध्ये पवन एक्सप्रेसचा अपघात ; 10 डब्बे रुळावरून घसरले, गाड्यांचे मार्ग बदलले


नाशिक जवळ पवन एक्सप्रेस अपघात, 10 डब्बे रुळावरून घसरले, एकाचा मृत्यू तर 5 जखमी 
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील देवळाली ते लहावीत गावा दरम्यान रविवारी 4 वाजेच्या सुमारास मुंबई ते जयनगर (दरभंगा ) जाणाऱ्या पवन एक्सप्रेसचे 10 डब्बे रुळावरून खाली घसरले. या अपघातात 5 जन जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. परंतु मृत्यू झालेली व्यक्ती रेल्वे प्रवासी नसल्याचे रेल्वे कडून सांगण्यात आले आहे. अपघात स्थळी रेल्वेचे अधिकारी, मदत व बचाव कार्य करणारी रेल्वे वॅन आणि वैद्यकीय टीम दाखल झाली आहे.
पवन एक्सप्रेसच्या अपघातानंतर त्या मार्गावरील गाड्यांच्या मार्गात बदल
पवन एक्सप्रेसच्या अपघाता नंतर त्या मार्गावर धावणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.मध्यरेल्वे प्रशासनाने एक हेल्प लाईन नंबर सुद्धा जरी केला आहे.
पवन एक्सप्रेसचे डब्बे उतरले खाली 
 पवन एक्सप्रेस क्र.1106 ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते जयनगर जात असताना नाशिक पासून 20 किमी दूर देवळाली व लहावीत गावादरम्यान गाडीचे 10 डब्बे घसरून अपघात झाला आहे. यादरम्यानचा मार्ग उंचावर आणि वळणी असल्याने गाडीच्या एका डब्याचे चाके रुळावरून खाली घसरली. त्यानंतर त्यामागील बाकीचे डब्बे रुळावरून खाली घसरले असल्याचे रेल्वे सूत्राकडून सांगण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने मदतीसाठी हेल्प लाईन नंबर जारी केला आहे
अपघात ग्रस्त गाडीच्या प्रवाशांच्या मदतीसाठी व नातेवाईकांसाठी मध्य रेल्वेने एक हेल्प लाईन नंबर जारी केला. 0222694040 या नंबर वर मदतीसाठी संपर्क साधता येईल असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. नाशिक शहरातून प्रशासकी टीम मदत कार्यादाठी अपघात स्थळी पाठली असल्याचे नाशिक चे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले आहे.

रद्द केलेल्या गाड्या :
12617 निजामुदिन मंगला एक्सप्रेस
12071 जालना जनशताब्दी एक्सप्रेस
12188 जबलपूर गरीबरथ 
11071 वाराणसी एक्सप्रेस
01027 एलटीटी - गोरखपूर समर स्पेशल
मार्ग बदलेल्या गाड्या 
22221 निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस वाया दिवा- वसई 

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng