धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या सभावर बंदी घालावी ; नाना पटोले

हिंदू-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांवर कठोर कार्यवाही करावी - नाना पटोले 
मुंबई : हिंदू-मुस्लिम वाद करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या सभावर बंदी घालावी असे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार आपले अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारे  धार्मिक तेढ निर्माण करून इंधन दरवाढ व महागाईच्या मुद्यावरून लक्ष हटविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. जे लोक राज्यातील वातावरण बिघडविण्याचं आणि सामाजिक एकोपा, शांतता व सौहार्द संपविण्याचं षडयंत्र करत आहेत त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

आम्ही सर्वधर्म संभाव मानतो आणि धर्मही हेच सांगतो. त्यामुळे आम्हाला प्रार्थना करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसल्याचे यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे.जे लोक दुसऱ्याच्या धर्मावर टीका करतात न ते राज्य घटनेला मानत नाहीत. लोकांमध्ये 'धार्मिक द्वेष' पसरवून मूळ मुद्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविणे हाच भाजपाचा उद्देश आहे. परंतु जनता याला बळी पडणार नाही. देशात नुकत्याच पारपडलेल्या पोटनिवडणुकात भाजपाला एक ही जागा जिंकता आली नाही. आता देक्षातील जनतेला भाजपाचे षडयंत्र समजले असल्याचे नाना पटोले म्हणाले.

राज्याची बदनामी करणाऱ्यावर कार्यवाही करावी असे पटले म्हणाले. राज ठाकरे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना 'सुपारी बाज' म्हटले होते. आता त्यांनाच विचारा राज ठाकरे यांनी कोणाची सुपारी घेतली आहे तेच सांगू सांगू शकतील.दिल्ली उत्तराखंड व उत्तर प्रदेशात कायदा हातात घेऊन दंगली घडवून आणल्यात. त्यात कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे.

महाराष्ट्रात ही अशा दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र, महाराष्ट्र सरकारने त्यांचे हे मनसुबे उधळून लावले आहेत. राज्य सरकारनी सर्वधर्माच्या धर्म गुरूंना बोलावून चर्चा करावी व योग्य तो तोडगा काढावा. तसेच महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांवर कठोर कार्यवाही करावी असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
Previous
Next Post »