आताची मोठी बातमी!सातारा : गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ ; 14 दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी


वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा सत्र व जिल्हा न्यायालयाने 14 दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी 
सातारा : (maratha reservation )मराठा आरक्षणा संबंधी आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने 4 दिवसांपूर्वी सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावली होती. आज ती मुदत संपणार होती. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी तपासाच्या कारणाने न्यायालयात हजर करून पोलीस कोठाडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना आज सकाळी कोठाडीतून शहर पोलीस ठाण्यात नेत असताना वंदे मातराम, भारत माता की जय अशा घोषणा देत जुल्म कधी जिंकत नसतो विजय सत्याचाच होतो असे म्हटले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केल्या नंतर सायंकाळी 5:30 वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते.



Previous
Next Post »