पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासाच्या आधारे आरोपिंना अटक केली असून त्यांची तुरुंगात रवानगी केली असल्याचे विभागीय अधिकारी अशोक सिंह यांनी सांगितले आहे. आरोपीवर एससी.एसटी कायद्याच्या कलम 147, 149 व 506 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना ही 10 एप्रिलची आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की 10 एप्रिल रोजी पीडित अल्पवयीन मुलाच्या मित्राने घरी येऊन बाहेर फिरायला जाऊ असे म्हणून दुचाकीवरून दोघे रामलीला मैदानात नेले. त्यानंतर एका गार्डन मध्ये त्याला नेले. तिथे काहीजण आधीच उपस्थित होते. तिथे उपस्थित असलेल्या मुलांनी पीडित दलित अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली . बराच वेळ त्याला तिथे बसवून ठेवले नंतर त्याला पायदेखील चाटायला लावले. या घटनेचा विडिओ वायरल झाला आहे. या घटने नंतर पीडित मुलाने आपल्या आई सह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
ConversionConversion EmoticonEmoticon