नाशिक : शहरात विना परवाना हनुमान चालीसा पठण केल्यास 4 महिन्याचा तुरुंगवासाच्या शिक्षेचा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काढला आहे.याही पुढे पोलिसांना गरज वाटल्यास शहरातून हद्द पार केलं जाणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क वर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्याचे सरकारला सांगितले व त्यानंतर ठाण्यातील सभेत देखील मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्यासाठी 3 मे पर्यंत चा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी दिला आहे. 3 मे नंतर मस्जितीवरील भोंगे काढून टाकले नाही तर, मस्जितीसमोर 5 वेळा हनुमान चालीसा पठण केली जाईल असा ईशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
याच पार्शवभूमीवर नाशिक शहरात विना परवाना हनुमान चालीसा पठण करून कोणी धार्मिक तेढ निर्माण करणार असेल तर त्याला 4 महिन्याचा तुरुंगवासात पाठले जाणार असल्याचा आणि पोलिसांना गरज भासल्यास हद्द पार करण्याचा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काढला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon