मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी ; किल्ला कोर्टाने दिला निकाल


शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी तर 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी किल्ला कोर्टाने दिली.
मुंबई : शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भाने ऍड. गुणरत्न सदावर्ते किल्ला कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली (killa court sentences adv. Gunaratn Sadawarte 2 days police custody, 109 protesters judicial custody). रात्री पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली होती.एसटी संपकरी आंदोलकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ठेवत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना बेल होणार की जेल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती.या प्रकरणात सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांना भडकावले त्यामुळेच शरद पवार यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला  केल्याचा भक्कम पुरावा आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलीस कोठकडी मिळावी असा युक्तिवाद केला.त्यानंतर किल्ला कोर्टाने सदावर्ते यांना 11 एप्रिल पर्यन्त म्हणजे 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर इतर 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांना आता वरच्या न्यायालयात जमिनासाठी अर्ज करावा लागणार आहे.
Previous
Next Post »