जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात कार्यरत असल्या डॉक्टर विक्रमजित पाडोळे आणि त्यांच्या साथीदारांना आरोपीने दारूच्या नशेत शिवीगाळ, धक्का बुकी व मारहाण केली होती. रायगड जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थान कायद्या अंतर्गत कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करून कोरोना कशात प्रवेश केला होता.सदर प्रकरणी भा. द. वि. कलम 353, 504,269,270 व 188 आणि आपत्ती व्यवस्थान 2005 च्या कलम 85 अन्वये अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणार पोलिसांनी तपास करून अलिबाग सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश प्रथम श्रेणी व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सदर प्रकरणी सरकारी अभियोक्ता म्हणून वकील प्रमोद हजारे यांनी काम पाहिले. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एकूण 6 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या होत्या.
डॉ विक्रमजीत पाडोळे फिर्यादी, साक्षीदार डॉ साहिल मकानदार तसेच तपासी अंमलदार एस एस शेंबडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीबाद ऐकल्या नंतर सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरण्यात येऊन आरोपी विरुद्ध भा द वि 353 आणि आपत्ती व्यवस्थान कायदा 2005 अनुसार आरोपीला दोषी ठरविण्यात आले.वरील दोन्ही कलमान्वये आरोपीला 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा व 5 हजार रुपये दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon