परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजेवर बंदी ; पोलिसांनी नोटीस केला जारी


परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजे वाजवीण्यास बंदी असल्याची पोलिसांनी काढली नोटीस, आंबेडकर प्रेमिंच्या उत्साहावर पोलिसांनी टाकले विर्जन 
परभणी : 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मागील दोन वर्षाच्या कोरोना काल खंडानंतर पहिल्यांदाच कुठल्याही निर्बंधाविना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठया हर्षात व उत्साहात साजरी करण्याच्या तयारीला आंबेडकर अनुयायी लागले असताना 12 एप्रिल रोजी नानल पेठ पोलिसांनी मिरवणुकीत डीजे वाजवीण्यास  बंदी असल्याची नोटीस जारी केली आहे.
पोलिसांनी काढलेल्या नोटीसीत सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत डीजे वाजवीण्यास बंदी घातली असल्याचे म्हटले आहे.पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसीत सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाज वाद्य, लाऊड स्पीकर किंवा डीजे वाजवीण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास 5 वर्ष कारावासाची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होणार असल्याचे नमूद केले आहे.

पोलिसांनी मिरवणुकीत डीजे वाजवीण्यास बंदी असलल्याची नोटीस जारी केली असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीतील उत्साहावर विर्जन टाकल्या सारखे आहे.असं असलं तरी आंबेडकर अनुयायी मिरवणुकीत डीजे वाजवणार हे मात्र नक्की आहे.


Previous
Next Post »