बाबासाहेब आंबेडकरांची जयंती राज्यात मोठ्या उत्साहात साजरी
मुंबई : 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती राज्यात मोठ्याउत्सहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या मागील दोन वर्षाच्या कालखंडानंतर कुठल्याही निर्बंधाविना पहिल्यांदाच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकरी अनुयायांनी राज्यात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्य भूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. अनेक ठिकाणी मंत्री, खासदार,आमदार व विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात उपस्थित राहून तसेच मिरवणुकीतील ढोल ताशे व डीजेच्या तालावर ठेका धरून जयंती उत्सवात सहभाग घेतला. मिरवणुकीतील विविध आकर्षक देखावे बाबासाहेबांच्या विचारांचे संदेश देणारे होते.
जयंती निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना रंगीबेरंगी आणि आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानाचे प्रतीक( symbol of knowledge ) म्हणून संबोधल्याजाते . त्यामुळे त्यांचा आदर्श म्हणून 18 तास अभ्यास करून व विविध उपक्रम राबवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
ConversionConversion EmoticonEmoticon