राज्य सरकारचा एसटी कर्मचाऱ्याला कामावर रुजू होण्याचा अल्टीमेटम ; अन्यथा कठोर कार्यवाही केली जाणार - उपमुख्यमंत्री अजीत पवार

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचा अल्टीमेटम ; अन्यथा कठोर कार्यवाही - उपमुख्यमंत्री अजीत पवार 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचा अंतिम पर्याय राज्य सरकारने दिला आहे.1एप्रिल पासून संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे अन्यथा कठोर कार्यवाही केली जाणार असल्याचा ईशारा उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यावर बडतर्फी किंवा सेवासमाप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे जर ते कामावर रुजू झाले तर त्यांच्यावरील कार्यवाही मागे घेणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची गुरुवार 31 मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. जे संपकरी कर्मचारी 1 एप्रिल पासून कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्यावर बडतर्फी किंवा सेवासमाप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

सध्या जे कर्मचारी एसटी महामंडळात कामावर आहेत त्यांच्या सोबत 11 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एसटीची वाहतूक सुरु आहे. जे कर्मचारी मुदतीपूर्व  कामावर हजार होतील त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. मात्र जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत. त्यांना नौकरीची गरज नाही असे समजून  त्यांच्यावर बडतर्फी किंवा सेवासामाप्ती सारखी कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी हा ईशारा दिला आहे.

एसटी कर्मचारी एसटीचे राज्य सरकार मध्ये विलीनिकरन करण्याच्या मुद्यावर 5 महिन्यापासून संपावर आहेत. परंतु एसटी चे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने स्पष्ट केलं आहे. मात्र राज्य सरकारने या आधीच एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगार वाढ केली आहे. त्याचा 750 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारवर पडणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.




Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng