पुणे : पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकाची मोठी कार्यवाही ; ड्रग्स विक्रीकरणाऱ्या कथित पत्रकाराला रंगेहात पकडून केली अटक


पिंपरी चिंचवड शास्त्र विरोधी पथकाने ड्रग्स विक्री करणाऱ्या कथित पत्रकाराला रंगेहात पकडून 272 ग्राम 32 लाख 61 हजार 700 रुपयाचे ड्रग्स केलं जप्त 
पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये 'मोफेड्रॉन' ड्रग्स (mephedrone drugs)विक्रीचा धंदा करणाऱ्या एका कथित पत्रकाराला पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. पत्रकारितेच्या नावाखाली ड्रग्स विक्री होत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शस्त्र विरोधी पथकला आदेश देऊन कार्यवाही करण्याचे सांगितले. त्यानुसार शस्त्र विरोधी पथकाने वेशांतर करून भंडारा डोंगर परिसरात चाकण तळेगाव धाभाडे मार्गावर सपळा रचला.

यादरम्यान MH 04 KL 8762 सेलेरो कार तिथून जात असताना दबाधरून बसलेल्या पोलिसांना संशय आल्याने कार थांबवून कार चालक व स्वतःला पत्रकार असल्याचे बतावणी करणाऱ्या नदीम इनायत पटेल याची झाडाझाडाती घेतली असता त्याच्याकडे 272 ग्राम 'मेफेड्रॉन' ड्रग्स आढळून आले. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 32  लाख 61 हजार 700 रुपये आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार या पथकाचे  नेतृत्व करणारे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, सा उप.निरीक्षक भरत गोसावी, सा.उप निरीक्षक लखनकुमार वाव्हळे, सा.उप निरीक्षक शामराव शिंदे, पोलीस हवालदार नामदेव वडेकर,पो. हवालदार चंद्रकांत गवारी, पो. हवालदार प्रीतम वाघ, वशिम शेख, पो.कॉ. मोसीन अत्तार व पो. कॉ मुळीक यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. पत्रकारितेच्या नावाखाली ड्रग्स विक्री करणाऱ्या माफियाला रंगेहात पकडून आमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा परदाफास केला. पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या पथकाला 30 हजार रुपये बक्षीस जाहीर केलं आहे.  
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng