औरंगाबादहुन मुंबई कडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेस वर मध्यरात्री सशस्त्र दरोडा ; प्रवाशांचे पर्स, दागिने आणि मोबाईल घेऊन दरोडेखोर फरार

दौलताबाद पोटुळ दरम्यान देवगिरी एक्सप्रेस वर सशस्त्र दरोडा, प्रवाशांचे पर्स, दागिने व मोबाईल लुटून दरोडेखोर फरार 
औरंगाबाद : औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसवर 22 एप्रिल च्या मध्यरात्री दौलताबाद पोटुळ दरम्यान सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. गाडीमधील प्रवाशांचे पर्स, दागिने आणि मोबाईल लुटून दरोडेखोर फरार झाले.

यापूर्वी देखील अशीच घटना 5 तारखेला घडली होती. लाल रंगाचे कापड दाखवून गाडी थांबवून प्रवाशांची लूट मार केली होती. त्यानंतर त्या ठिकाणी काही दिवस पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त काढून घेतल्यानंतर दुसऱ्यांदा ही घटना घडली आहे. हा प्रकार लोको पायलटच्या लक्षात आल्यानंतर गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला मात्र दरोडेखोरांनी चैन ओढून गाडी थांबविली आणि फरार झाले.

विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी रुग्णवाहीका उभी होती. दरोडेखोर रुग्णवाहीका घेऊन फरार झाले. पोलिसांना चकमा देण्यासाठी दरोडेखोरांनी रुग्ण वाहिकेचा वापर केला असल्याचे समोर येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून रेल्वे प्रशासनाने उपाय योजना करावी अशी मागणी प्रवाशाकडून होत आहे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng