दुचाकीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू तर 7 वर्षाची मुलगी गंभीर जखमी
पुणे : पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेले झाड कोसळून दुचाकीवर पडल्याने नव विवाहित जोडप्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेली 7 वर्षाची त्यांची भाची गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे.घटने बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 22 एप्रिल रोजी सायंकाळी पाऊस आणि वादळ वारा सुरु होता. दरम्यान मयत रेणुकेश गुणशेखर जाधव वय 29 वर्ष व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव वय 23 वर्ष आणि त्यांच्या सोबत 7 वर्षाची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे तिघे सासवडवरून परिंचेकडे दुचाकीवरून जात होते. मात्र 7 वाजेच्या सुमारास पिंपळे येथून जात असताना रस्त्याच्या कडेला अर्धवट जळालेले वडाचे झाड अंगावर कोसळले.या दुर्धटनेत रेनुकेश आणि सारिका या नव विवाहित जोडप्याचा जागीच मृत्यू झाला तर भाची ईश्वरी संदेश देशमुख ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे.
घटने नंतर परिसरातील नागरिक मदतीला धावून आले.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रसतांना सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.मुलगी ईश्वरी बेशुद्ध असल्याने तिला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.रेनुकेश आणि सारिका यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. दोघांच्या अपघाती मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon