दिल्ली : सध्या UPA चे अध्यक्ष कोण होणार याकडे राजकीय घडामोडीना वेग आला आहे. नुकत्याच पाच राज्याच्या निवडणूकित काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. याच पार्शवभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वावरून वाद आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या काळात सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मजबूत आघाडीची गरज आहे.
2024 मध्ये भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मजबूत पुरोगामी विचारांची आघाडी निर्माण करण्यासाठी अनेक पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे देखील आघाडी साठी प्रयत्न करत आहेत.त्यानुसंगाने दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक पारपडली. बैठकीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांच्या नावाचा ठराव मांडण्यात आला व ठराव संमत सुद्धा झाला. त्या भैठकीला शरद पवार देखील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ठराव संमत केल्यामुळे राजकीय घडामोडीना वेग आला आहे.
शरद पवार हेच भाजपा विरोधी पक्षांना एकत्र अनुशकतात असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मत आहे.आता बघावं लागेल की शरद पवार हे UPA चे अध्यक्ष होणार?
ConversionConversion EmoticonEmoticon