नागपुरात पोलीस उपनिरीक्षकाने केला तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
नागपूर : जनतेचा रक्षक म्हटल्या जाणाऱ्या नागपूरातील एका पोलीस उपनिरीक्षकाने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने इंस्टग्रामवरून ओळख झालेल्या एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कपिल नगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय ठाकरे (रा. वाशीम ) असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून गुन्हा दाखल होताच हा पोलीस अधिकारी फरार झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठाकरे हा हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. कपिल नगर मध्ये रहात असलेल्या एका 23 वर्षीय तरुणीशी इंस्टाग्राम वरून ओळख झाली होती. तरुणी एका कंपनीत इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती.
इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीने त्यांच्यात जवळीकता आली. त्यानंतर पोलीस अधिकारी असल्याचा धाक दाखवून तरुणीसोबत सतत शारिक संबंध ठेवत राहिला.त्यानंत तरुणी दोन महिन्याची गर्भवती राहिलील्याने तिने अक्षय ठाकरे यास सांगितले असता तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास सांगितले.त्यावर पीडित तरुणीने गर्भपात करण्यास नकार देऊन लग्न करण्याची मागणी केली. त्यावर अक्षय ठाकूर याने लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने अक्षय ठाकरे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या आरोपी अक्षय ठाकरे हा फरार आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon