Karnataka bus accident :कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात बस उलटली ; अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू तर 20 जन जखमी

कर्नाटकात तुमकूर जिल्ह्यातील बस उलटून भीषण अपघातात 8 जनांचा मृत्यू, मृतामध्ये शालेय विद्यार्थी असल्याची शक्यता 
तुमकूर :(Bus accident in Tumakur district of Karnataka ) कर्नाटक मध्ये तुमकूर जिल्ह्यातील पावागड जवळ प्रवाशांनी भरलेली बस उलटून झालेल्या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 20 पेक्षा अधिक जन जखमी झाले असल्याची माहिती तुमकूर पोलिसांनी दिली असल्याचे कळते. चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.
अपघातग्रस्त बस मध्ये 60 प्रवाशी प्रवास करत होते. या दुर्दैवी अपघातात शालेय मुलांचा देखील मृत्यू झाला असल्याचे तुमकूर पोलिसांनी सांगितले आहे.या भीषण अपघातात जखमी झालेल्या 8 जनांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
Previous
Next Post »