औरंगाबाद महापालिकेत सत्ता बदल करण्याचे डॉ सुरेश माने यांचे आवाहन


आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखून मतदानाचा वापर करावा -ऍड. डॉ सुरेश माने 
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सत्ता बदल करण्याचे आवाहन डॉ सुरेश माने यांनी केलं
20 मार्च रोजी महाड चौदार तळे सत्याग्रह व बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्त  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी औरंगाबाद जिल्हा युनिटच्या वतीने जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते.या ऐतिहासिक सभेला नागरिकांची तोबा गर्दी गर्दी केली होती. विशेष म्हणजे डॉ माने यांच्या स्वागतासाठी 200 किलो फुलांचा हार बनवण्यात आला होता आणि हार घालण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला.
 औरंगाबाद शहरातील काबरा नगर गारखेडा परिसरात आयोजित सभेला संबोधित करताना बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ सुरेश माने संबोधित करत असताना येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत सत्ता बदल करण्याचे आवाहन नागरिकांना केलं.आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे मतदारांनी ओळखून योग्य ठिकाणी मतदानाचा वापर करा असं देखील माने यांनी सांगिले.
मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाची उत्तर प्रदेशात झालेली हार याला मायावतीच जबाबदार असल्याची टीका करताना मायावती यांनी एकप्रकारे भाजपाला मदतच केली आहे. कोना सोबत जायचं नाही कोणाला सोबत घ्यायचं नाही. मायावती यांच्या अशा आठमुठ्या भूमिकेमुळे भाजपालाच मदत होत आहे. यावरून मायावती भाजपाची 'बी' टीम असल्याचे सिद्ध झालं आहे. याच सोबत प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील सडकून टिका केली असून महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे भाजपाची 'बी' असल्याचे म्हटले आहे.
 औरंगाबादचा महापौपूर हा बीआरएसपीला विचारात घेतल्याशिवाय  होणार नसल्याचा दावा सभेचे आयोजक तथा जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी केला आहे. दरम्यान लोकशाही विचार मंचचे अध्यक्ष अज्जू भाई यांनी डॉ सुरेश माने यांच्या उपस्थितीत बीआरएसपी मध्ये पक्ष प्रवेश केला, तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी काही ईच्छुक उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली 
  https://youtube.com/channel/UCFgmjJWMfTL3JCB4ob3SXNg

या सभेला सतीश बनसोडे( प्रदेश सचिव ), ऍड. माणिक आदमने (प्रदेश सचिव ), ऍड. कपिल खिल्लारे (मराठवाडा संघटक प्रमुख), पृथ्वी शिंदे (बीड जिल्हा प्रभारी ), मनिष वाव्हळे (जिल्हाध्यक्ष परभणी ), सुभाष वाव्हळे (जिंतूर ता.अध्यक्ष कामगार आघाडी ), गुलाब प्रधान (जिंतूर ता.अध्यक्ष-शेतकरी आघाडी ), रतन वाव्हळे, माधव वाव्हळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचं प्रस्ताविक विकास वाव्हळ यांनी केलं तर आभार सय्यद नुसरत यांनी व्यक्त केले.सभा यशस्वी करण्यासाठी शेख अजीम भाई वणीकर जिल्हा उपाध्यक्ष, राजु निकाळजे युवा जिल्हाध्यक्ष,शहर अध्यक्ष निसार भाई,शेख मोसीन भाई. शहर अध्यक्ष अनामी मोरे, सुभम नवगिरे आदींनी परिश्रम घेतले.
Previous
Next Post »