राज्यपाल भगतसिंह कोश्यारिंचा थेट हस्तक्षेप ; राज्यसरकारचा निर्णय डावलून डॉ सुनील पोखर्णांच निलंबन रद्द BreakingNews

राज्यपालांनी विशेष अधिकार वापरून राज्यसरकारचा निर्णय डावलून डॉ सुनील पोखर्णांच निलंबन केलं रद्द 
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 16 डिसेंबर रोजी आग लागली होती.या आगीत आयसीयू विभागातील 4 मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 4 जनावर अटकेची कार्यवाही करण्यात आली होती.परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या विशेष अधिकाराचा वापर करत राज्य सरकारचा निर्णय डावलून डॉ. सुनील पोखर्णा यांचे निलंबन रद्द करून त्यांना शिरूर येथे पदस्थापना देण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यपाल आणि राज्यसरकार यांच्यातील  वाद आणखी पेठलेला दिसत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आय सी यू वॉर्ड मध्ये लागलेल्या आगीमुळे 4 मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी 4 जनावर अटकेची कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला होता. यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखर्णा यांचं ही निलंबन करण्यात आलं होत. त्यांच्या अटकेची देखील मागणी करण्यात आली होती.

राज्यपालांनी विशेष अधिकार वापरून डॉ पोखर्णा यांचं निलंबन रद्द केलं असून त्यांना जवळच्याच शिरूर येथे पदस्थापना दिली ही विशेष बाब आहे. डॉ पोखर्णा यांच्यावर अजून कोणतीच कार्यवाही होताना दिसून येत नाही. विभागीय आयुक्ताकडून चौकशी अहवाल राज्यसरकार कडे देण्यात आला आहे मात्र अजून तो अहवाल उघड केला नाही.त्यामुळे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अहवालात नेमकं काय आहे हे अजून स्पष्ट झालं नाही.
Previous
Next Post »