मुलीला वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणार नाही ; सर्वोच्च न्यालयाचा महत्वपूर्ण निर्णय

दीर्घकालावधीपासून मुलांनी वडिलांशी कोणतेच नातेसंबंध ठेवले नसतील तर त्यांना वडिलांना पैसे किंवा संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार नाही - सर्वोच्च न्यायालय
दिल्ली : जर मुलीने आपल्या वडिलांशी कोणतेच नाते संबंध ठेवले नसतील तर त्या मुलीला वडिलांकडून पैसे किंवा संपत्तीत हिस्सा माघण्याचा अधिकार नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना स्पष्ट केलं आहे की, जर मुलं आपल्या वडिलापासून दूर राहत असतील आणि वडिलांशी कोणतेच नाते ठेवत नसतील तर त्यांना आपल्या वडिलांना पैसे किंवा वडिलोपार्जित धनसंपत्ती मध्ये हिस्सा माघता येणार नाही.

न्यायमूर्ती किशन कौल आणि न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाणे एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाणे निर्णय देताना स्पष्ट केलं आहे की जर मुलीने बऱ्याच कालावधीपासून आपल्या वडिलांशी कोणतेच नातेसंबंध ठेवले नसतील आणि ती वडिलांच्या संपर्कात नसेल तर तिला वडिलांकडून पैसे माघण्याचा अधिकार राहात नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणात मुलगी 20 वर्षाची असताना तिने आपल्या वडिलांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. ती सज्ञान असल्यामुळे तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु तिने आपल्या वडिलांशी कोणतेच नातेसंबंध ठेवले नाहीत. मात्र आता ती मुलगी आपल्या वडिलांकडून शिक्षणासाठी पैश्यांची मागणी करत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत स्पष्ट केलं आहे की मुलीला तस करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना निरीक्षण नोंदवलं आहे की मुलीच वय तिला भविष्यातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतं. मात्र आता तिला वडिलांना पैसे मागण्याचा अधिकार राहिला नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.


Previous
Next Post »