भारतीय लष्करी दलात भरती होण्याचे स्वप्न भंगलेल्या तामिळनाडूतील सैनिकेशने चक्क युक्रेनकडून लढण्यास घेतली हातात बंदूक
कोईम्बतूर : तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका तरुणाने युक्रेनकडून युद्धात लढण्याची तयारी केली असल्याची माहिती मिळाली आहे.भारतात सैन्यात भरती होण्याचे स्वप्न भंगल्याने कोईम्बतूर येथील 21 वर्षीय सैनिकेश रवीचंद्रन या तरुणाने चक्क युक्रेनकडून युद्धात लढण्याची तयारी केली आहे.केंद्रीय तपास यंत्रणाचे अधिकारी सैनिकेश याचे कागदपत्रे तपासणीसाठी थुडियालूर या गावी गेले असता त्यांना ही धक्का दायक बाब लक्षात आली.भारतीय लष्करात भरती होण्याची सैनिकेश खूप ईच्छा होती. त्यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र उंची कमी असल्याने सैन्यात भरती होण्याची संधी दोन वेळा हुकली होती. लष्करात भरती होण्याची ईच्छा असल्याने सैनिकेशने अमेरिकन सैन्यात भरती होण्यासाठी त्यांच्या दुतावसाशी संपर्क केला होता परंतु तिथेही नकार मिळाला होता.सैनिकेश हा युक्रेन मध्ये एरोस्पेस इंजिनीरिंग चे शिक्षण घेत होता.
मध्यन्तरी त्याला विडिओ गेम बनवणाऱ्या कंपनीमध्ये नौकरी मिळाली होती. परंतु आता युक्रेन मध्ये अचानक युद्ध सुरु झाल्याने सैनिकेश ने युक्रेन कडून युद्धात लढण्यासाठी हातात बंदूक घेतली असल्याने सर्वकाही विस्कळीत झाल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले आहे.
युक्रेन मधील खरकीव्ह येथे नॅशनल एरोस्पेस विद्यापीठात 2018 पासून इंजिनीरिंगचे शिक्षण घेत आहे. तो सध्या जॉर्जियन नॅशनल लिजन मध्ये सहभागी झाला आहे.निमलस्करी दलाच्या पथकामध्ये सहभागी असून रशिया विरुद्ध लढत आहे.सैनिकेशला भारतात लवकरात लवकर परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे अशी विनंती त्याचे आई वडील करत आहेत.सैनिकेश बद्दलची बातमी समाजातच मला धक्का बसला आहे. त्याची परत येण्याची मी वाटबघत असल्याची त्याची आई 'लक्ष्मी' यांनी सांगितले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon