पुणे : पिंपरी मध्ये एका अल्पवयीन मुलीवर जीवेमारण्याची धमकी देऊन केला लैंगिक अत्याचार. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव दत्ता कमलाकर सूर्यवंशी (वय 36 रा. मोरेवस्ती चिखली )असे आहे.मोरे वस्ती चिखली येथे 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या संदर्भात एका महिलेने बुधवार 9 मार्च रोजी तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून आरोपीने अल्पवयीन मुलीला त्याच्या भावाच्या लग्नासाठी घेऊन गेला होता. मुलीला त्याच्या घरी ठेऊन घेऊन तिला मारहाण करत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon