बीड : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूकवर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या वाहनास भीषण अपघात झाल्याने मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.गेवराई तालुक्यातील सावळेश्वर फाटा येथे रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करण्यासाठी महसूल विभागाचे पथक शनिवारी रात्री गस्तीवर गेले होते. गस्तीवरून परत येताना सोमेश्वर फाटा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर वाहन आदळल्याने अपघात झाला.या मध्ये म्हाळसाजवळा ता बीड येथील मंडळ अधिकारी नितीन जाधव (33) यांचा जागीच मृत्यू झाला तर बीड चे तहसीलदार सुरेंद्र डोके हे गंभीर जखमी झाले.
अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा समोरचा भाग झाडाच्या खोडात अडकला होता. अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ अपघात स्थळीधाव घेऊन वाहनातून दोघांना बाहेर काढले.
जखमी सुरेंद्र डोके यांना उपचारसाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात पाठवले.अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा हे अन्य अधिकाऱ्यासोबत रुग्णालयात आले आणि त्यांनी जखमी सुरेंद्र डोके यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना पुढील उपचारसाठी पुणे येथे पाठविण्यात आले.मंडळ अधिकारी नितीन जाधव यांच्या मृत्यू बद्दल जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी दुःख व्यक्त केलं.
ConversionConversion EmoticonEmoticon