कॅप्टन आमरिंदर सिंह यांनी पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा, पंजाब मधील मोठे नेते म्हणून भाजपानेही केले निर्णयाचे स्वागत.

पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर काँग्रेसला सोडचिट्टी देऊन नविन पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला देणार टक्कर
आमरिंदर सिंह यांना महिन्यापूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले त्यामुळे नाराज झालेल्या आमरिंदर सिंह यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. येत्या काही महिन्यात पंजाब विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्शवभूमीवर आमरिंदर सिंह यांनीमंगळवारी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. भाजपाने ही आमरिंदर सिंह यांच्या निर्णयाचे स्वागत करून आमरिंदर सिंह पंजाबचे मोठे असल्याचे म्हटलं आहे. काँग्रेसला शह देण्याची तयारी आमरिंदर सिंह यांची असून शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा निघाल्यास भाजप सोबत आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.

आमरिंदर सिंह यांच्या दिल्लीतील प्रसारमाध्यम सल्लागारांनी ट्विटरच्या मध्येमातून या विषयी माहिती दिली आहे.काही दिवसापूर्वी दिल्लीतील सल्लागारांनी आमरिंदर याच्या वतीने ट्विट करून "पंजाबच्या भविष्याची लढाई सुरु झाली आहे.पंजाब आणि तेथील लोकांच्या तसेच मागील वर्षभरापासून आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच नविन पक्षाची घोषणा करणार आहे "असे सांगण्यात आले आहे. पंजाबमधील राजकीय घडामोडी बाबतीत चर्चाना उधाण आले आहे तर दुसरीकडे आमरिंदर सिंह यांच्या पत्नी परणीत कौर काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत. त्यांनी पक्ष सोडूनये यासाठी काँग्रेस कडून प्रयत्न केले जात आहेत.

पंजाबच्या हितासाठी व रक्षणासाठी नविन पक्ष 
पंजाबला बाहेरून असलेला धोका तसेच पंजाब मधील राजकीय अस्थिरता संपवून राज्याच्या हितासाठी पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला असल्याचे आमरिंदर सिंह यांचे सल्लागार असलेल्या रवीन ठाकुरलाल यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.
Previous
Next Post »