देशात दिवसेंदिवस वाढणारी ओमायक्रोनची संख्या चिंतेचा बाब आहे.त्यातच उत्तर प्रदेशात ओमायक्रोनची रुग्ण संख्या वाढत असल्याने उत्तर प्रदेश कोरोना बाधित राज्य म्हणून राज्यपालांनी घोषित केलं आहे.राज्याचे अतिरिक्त आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी 27 डिसेंबर रोजी एका आदेश जारी केला आहे.त्यामध्ये राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटलं आहे.परंतु विशेष बाब म्हणजे काही महिन्यावर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली असल्यामुळे या निर्णयामुळे निवडणुका कधी होणार असा संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.
राज्यपालांच्या नावाने काढण्यात आलेल्या आदेशात उत्तर प्रदेश सार्वजनिक आरोग्य आणि साथ नियंत्रण कायदा 2020 कलम 3 अंतर्गत संपूर्ण राज्य कोरोना बाधित घोषित करण्यात आल्याचे म्हटले आहे.हा आदेश 31 मार्च 2022 किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
राज्यात ओमायक्रोन रुग्णांची वाढती संख्या पहाता या आधीच 25 डिसेंबर पासून रात्रीची सांचार बंदी लागू करण्यात आली आहे.महाराष्ट्रात रात्रीची सांचार बंदी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत आहे.मात्र उत्तर प्रदेशात रात्रीची सांचार वंदी ही रात्री 11 ते सकाळी 5 पर्यन्त लागू करण्यात आली आहे.तसेच लग्न समारंभात 200 लोकांच्या उपस्थितितीला अनुमती देण्यात आली आहे.सर्वच कार्यक्रमात कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2 ओमायक्रोन चे रुग्ण आढळले होते परंतु ते कोरोना मुक्त झाल्याचे सांगितले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon