विठ्ठलवाडी रेल्वे स्थानाकावर सुरक्षा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचला तरुणाचा जीव
मुंबई : मध्ये रेल्वेच्या विठ्ठलवाडी रेल्वे स्थानाकावर सुरक्षा कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव. मुंबईतील मध्ये रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे लाईनवर विठ्ठलवाडी रेल्वे स्थानाक आहे. बुधवार दि.23 मार्च रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्थानकावर उभ्या असलेल्या एका तरुणाने अचानक रेल्वे रुळावर उडी घेतली असता तिथे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याने प्रसंगावधान पाहून कुठलाही वेळ न घालवता त्या तरुणाच्या दिशेने उडी घेऊन त्याला रेल्वे रुळावरून बाहेर लोटून दिले.त्यानंतर काही सेकंदातचं तिथून गाडी गेली.सुरक्षा कर्मचाऱ्याने प्रसंगावधान पाहून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या तरुणाचा जीव वाचवला. या सुरक्षा कर्मचाऱ्याच कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon