झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉक्टरेट पदवीने डी वाय पाटील पुणे विद्यापीठाने केलं सम्मानित
पुणे : झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉक्टरेट( D.lit ) पदवी देऊन डी.वाय पाटील विद्यापीठाने केलं सम्मानित. गुरुवार 24 मार्च रोजी आयोजित एका कार्यक्रमात डी.वाय पाटील पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना डॉक्टरेट (Doctor in litrature ) ही पदवी देऊन गौरव करण्यात आला. समाजाचं वास्तव चित्रपटाच्या रूपाने लोकांसमोर मांडणारे संघर्षशील बहू आयामी व्यक्तिमत्व असलेले नागराज मंजुळे हे झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.झुंड चित्रपट हा प्रेषकांना खूप आवडला असून चित्रपटाने मोठी कमाई देखील केली आहे.
नागराज मंजुळे यांनी फॅन्ड्री,सैराट या सारखे वास्तववादी चित्रपट या पूर्वी दिग्दर्शित केले आहेत. महाराष्ट्रातील समाज वास्तव निर्भीड पणे चित्रपटाच्या रूपाने दाखवणारे एकमेव दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन डी.वाय पाटील पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सम्मान केला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon