दिल्लीत आतंकवादी हमल्याची सूचना मिळाल्याने हाय अलर्ट देण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.
दिल्ली : (Delhi high alart on terrorist attact) दिल्लीतील इंदिरा गांधी अंतरराष्ट्री विमानतळ वर आतंकवादी हल्ला केला जाणार असल्याचा ई मेल युपी पोलिसांना मिळाला असल्याने दिल्ली हाय अलर्टवर आहे.एएनआई या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी अल कायदा या आतंकवादी संघटनेकडून उत्तर प्रदेश पोलिसांना ई -मेल प्राप्त झाला होता.ज्यामध्ये सिंगापूरहुन रविवारी रणबीर सूरी उर्फ मोहम्मद जलाल व त्याची पत्नी शैली शारा उर्फ हसीना भारतात येणार आहेत. ते मोठा बॉम्ब हल्ला करणार असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली होती.आतंकवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.बॉम्ब हल्ला करण्यात येणार असल्याचा ई मेल मिळाला असल्याने दिल्लीत ठीक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्ब ने उडवून देण्यात येणार असल्याचा ई मेल करणबीर सूरी उर्फ मोहम्मद जलाल आणि त्याची पत्नी शैली शारा उर्फ हसीना सिंगापुरवरून दिल्ली येत असून मोठा बॉम्ब हल्ला करणार असल्याची माहिती ई -मेल द्वारे आतंकवादी संघटना अल कायदा ने दिली आहे.
दिल्ली आतंकवाद्याच्या निशाण्यावर असल्याचा आणि मोठा आतंकी हमला दिल्लीमध्ये घडवून घातपात करण्याचा इरादा आतंकवादी संघटनेचा असल्याने विमान तळाची सुरक्षा व इतर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा दिल्ली सरकार कडून कडक करण्यात आली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon