महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मागणी, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार - जितेंद्र आव्हाड
मुंबई : ईव्हीएम( evm) बदल देशातील अनेक राजकीय पक्षांना संशय आहे. त्यामुळे ईव्हीएम( evm)ऐवजी मतपत्रिकेवर (ballot paper )मतदान घेण्याची मागणी करताना दिसत आहेत.अनेक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्या जात आहेत.त्याच पार्शवभूमीवर महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर ballot paper ) निवडणुका घेण्याचा प्रयोग करावा अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा राज्याचा निर्णय आहे.त्यामुळे महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवरच (ballot paper ) घ्याव्यात,असे ट्विट गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.त्यानंतर पत्रकारांनी आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबतची माहिती दिली.
कर्नाटक राज्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्या असल्याचे समजले आहे. तो राज्याचा निर्णय आहे.ई व्ही एम (Evm ) बद्दल जनते मध्ये आणि विविध राजकीय पक्षात शंका-कुशंका असल्याने एक प्रयोग म्हणून महाराष्ट्रात मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात अशी माझी अग्रही मागणी असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. राज्यात निवडणुका घेणाचा राज्यसरकारचा निर्णय आहे. त्यासाठी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा प्रस्ताव देखील मांडणार असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon