लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागला. त्यात भाजपाने 273 जागावर विजय मिळवून पुन्हा सत्तेवर सवार झाली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 125 जागावर समाधान मानावे लागले आहे. समाजवादी पक्ष हा राज्यातील विरोधी पक्षाची भूमिका पारपाडणार आहे.
परंतु अखिलेश यादव यांनी काल मंगळवारी ट्विटरवर माहिती दिली की, त्यांच्या सपा आघाडीला 51.5टक्के पोस्टल मते मिळाली आहेत. त्यावरून सपा आघाडीला 304 जागी विजय मिळाला असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे . हे सत्य बाहेर येत असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत सपा आघाडीला ज्या अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांनी मोठ्याप्रमाणात पोस्टल मते दिली त्याबद्दल त्यांचे आभार अखिलेश यादव यांनी मानले आहेत.
समाजवादी पक्ष आणि आघाडीला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवरून उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील सत्य उघड होत आहे.भाजपा सरकारने ईव्हीएम( evm)मध्ये फेरफार केल्याचा अखिलेश यादव यांचा आरोप आहे.सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे की कपटीपणाने ताकद मिळत नाही, "असं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon